नाशिकच्या जागेसाठी धावाधाव; बोरस्ते मुंबईत, गोडसे कल्याणमध्ये

 नाशिक: लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेसाठी धावपळ सुरूच असून शुक्रवारी (दि. 12) शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव अचानक चर्चेत तर आलेच शिवाय त्यांना तातडीने मुख्यमंत्ऱ्यानी बोलवल्याने ते मुंबईत रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

 दुसरीकडे ते मुंबईला गेल्याचे कळताच खासदार हेमंत गोडसे देखील तातडीने कल्याण येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले. 

भुजबळ फार्मवर ड्रोन उडविला; फोटोग्राफर वर गुन्हा नोंदविला

उभयतांनी नाशिक ची जागा शिंदेसेनेला मिळावी, हा एकमेव उद्देश असल्याचे संगीतले, नाशिक लोकसभा  मतदार संघासाठी  अद्यापही तिढा सुटलेला नाही. 

कधी जागा भाजप मिळाल्याची चर्चा होतात, तर कधी शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत देखील जुगलबंदी पाहायला मिळत होती. आता शिंदसेनेत अंतर्गतच ही स्पर्धा सुरू झाल्याचे दिसत आहे.  

Previous Post Next Post