पंचवटी: सोशल मीडिया वरुण ओळख करून नंतर मैत्री वाढवत राजस्थानच्या एका इसमाणे पीडित महिलेवर शहरासह परराज्यात घेऊन जात गुंगीचे औषध पाजून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थपित केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादिवरून संशयित आरोपी विवेक यग्यनारायण बोहरा (रा. करोलिया मार्ग, गीताभवण बस्ती, जि. ब्यावर) यांच्याविरुद्ध म्हसरूळ पोलिसांनी बलात्कारासह विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकच्या जागेसाठी धावाधाव; बोरस्ते मुंबईत, गोडसे कल्याणमध्ये
म्हसरूळ पोलिसांकडे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी विवेक याने सोशल मिडियाच्या माध्यमातून महिलेसोबत ओळख करून घेतली. यानंतर मैत्री वाढवून तिला भेटण्यासाठी तिच्या राहत्या घरी आला.
त्यावेळी काहीतरी गुंगीकारक औषध द्रवपदार्थातून पाजून बळजबरीने शारीरिक संबंध केले. त्यावेळी स्वत:च्या मोबईलने व्हिडिओ, फोटो काढून स्वत:जवळ ठेवत ते व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात शारीरिक अत्याचार केले.
बिटकोच्या तळघरात सापडला रुग्णाचा मृतदेह
पुणे, मुंबई, गांधीनगर, चिलोडा, राजस्थान आदि शहरात पीडितेला फिरविण्याच्या बहाण्याने घेऊन जात शरीरसंबंध केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात विवेकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक हाके करीत आहेत.