पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथील इयत्ता दहावीच्या प्रथम बॅच मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश...

 पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथील इयत्ता दहावीच्या प्रथम बॅच मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश...

दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यशाची मोहोर उमटवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ! पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथील इयत्ता दहावी परीक्षेचा १०० % निकाल लागला.

शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मध्ये शाळेचे एकूण १२ विदयार्थी परीक्षेस बसले होते. त्यामध्ये सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेतील अनुराग नवनाथ जाधव याने ९३. ४० टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकावला आहे,

श्रावणी निलेश खंडारे हिने ८८.६० टक्के गुण मिळवित द्वितीय क्रमांक पटकावला.

रुजूल सौरभ देवगावकर याने ८६.२० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांकावर यश संपादन केले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले.

Previous Post Next Post