“कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते”. “शिका ! संघटित व्हा ! असा मूलमंत्र देणारे, एक थोर भारतीय पुढारी, भारतीय संविधानाचे शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके, श्रावणी कमुजू, विशाल मेंढे, समन्वयक शिक्षक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करून आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. इयत्ता नववीची विद्यार्थीनी देविका हिने आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकरांच्या महतीची ओळख करून दिली.
विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी जयंतीनिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित सुंदर गीत प्रस्तुत केले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपल्या आकर्षक नृत्य सादरीकरणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची ओळख करून दिली.
भुजबळ फार्मवर ड्रोन उडविला; फोटोग्राफर वर गुन्हा नोंदविला
या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी गौरव कातकडे याने केले.