नाशिक: लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेसाठी उध्दव सेनेने उमेदवार घोषित केल्यानंतर इंडिया तथा महाविकास आघाडीची बैठक (दि.४) झाली खरी मात्र, या बैठकीला विजय करंजकर आणि माजी आमदार योगेश घोलप यांनी दांडी मारली.
हिरामण खोसकर देखील बैठकीला अनुपस्थित असल्याने हा चर्चेचा विषय ठरला, उध्दव सेनेच्या वतीने सिन्नरचे माजी आमदार राजभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर है नाराज झाले असून, ते बडखोरीच्या तयारीत आहेत.
हे ही वाचा :- नाशिकरोड परिसरात पोलिसांचे शक्तिप्रदर्शन....
वाजे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा मेळावा झाला. त्यावेळीच त्यानी नहणार आणि लढणार, अशी घोषणा दिली होती. नंतर ते पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना भेटणार आहेत. परंतु, अद्याप ते भेटले नसले तरी त्यांची नाराजी दूर झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई -आग्रा महामार्गावर एका हॉटेलमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीस करंजकर उपस्थित नव्हते त्याचबरोबर देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार योगेश घोलपदेखील अनुपस्थित होते. वाजे यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर करंजकर समर्थकांची जी बैठक झाली, त्यालाही योगेश घोलप उपस्थित होते.
हे ही वाचा :- जागा डेवलपमेंट करार करण्याकरता 28 कोटींची फसवणूक....
त्यामुळेच ऐन निवडणुकीत करंजकर आणि योगेश घोलप यांची नाराजी हा चर्चेचा विष ठरला आहे. दरम्यान, या बैठकीत माजी मंत्र डॉ. शोभा बच्छाव, नितीन भोसल नानासाहेब बोरस्ते, राजाभाऊ वाळ जयंत दिडे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, कोंडाजीमामा आव्हाड, श्रीराम शेटे, डॉ. हेमलता पाटील, भगीरथ शिंदे, अॅड. आकाश छाजेड यांनी मनोगत व्यक्त केले.
हे ही वाचा :- रेडिएटर तपासताना भाजलेल्या चालकाचा दुर्दैवी मृत्यू......
विजय करंजकर यांना उद्धव ठाकरे हे वेळ देणार आहेत. ज्यामुळे त्याच्या भावना समजावून घेतल्या जातील. गरज पडल्यास मी स्वतः करंजकर यांच्याशी बोलून नाराजी दूर करेन.असे राजाभाऊ वाजे यांनी सांगितलेल आहे.