नाशकात अमित शाह, शिंदे, पवार, ठाकरेंची होणार सभा......

 नाशिक: लोकसभा निवडणुकीची रण धुमाळी सुरू झाली असून, महायुती सह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांनी नाशिकचे गोल्फ क्लब मैदान पुन्हा एकदा चर्चेत आले

या मैदानाची 15 ते 18 मे रोजीची बुकिंग महापालिकेकडे संबंधित पक्षांनी नोंदवली आहे. 15 मे रोजी  उद्धव सेनेचे अध्यक्ष  व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, 16 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 17 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व  18 मे रोजी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभांचे आयोजन होणार आहे.

हे ही वाचा :- शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभा लढवण्यावर ठाम ; संजय राऊत यांची प्रतिक्रिया .......

निवडणुकीला अद्याप दोन महीने वेळ असला तरी राजकीय पक्षाकडून पूर्व तयारी केली जात आहे. महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांकरता विशेषत: गोल्फ क्लब मैदानाला पसंती मिळत आहे. राजकीय पक्षाकडून आतापासूनच या मैदानाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नेत्यांच्या जाहीर सभाकरता मैदान मिळावे यासाठी महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाकडे अर्ज सादर करण्यात आले आहे. 

Previous Post Next Post