नाशिकरोड: मनपा च्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाचा शुक्रवारी (दि. 12) तळघरात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

गुरुवारी (दि. 11 रात्री रुग्णालयातून पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला होता. सिडकोतील लेखानगरच्या गांधीनगर वासहतीतील आकाश किरण काळे (38) हा भाजीपाला व्यवसाय करणारा असल्याचे समजले. आकाश हा नेहमी मद्यसेवन करत असल्यामुळे पोटामध्ये त्रास होत होता.
पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....
त्यामुळे उपचारासाठी बुधवारी (दि.10) त्याला बिटको मध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री साडेआकरा वाजता त्याने रुग्णालयातून पळ काढला. शुक्रवारी (दि. 12) त्याचे नातेवाईक सकाळी रुग्णालयात आले असता, तो बेडवर नव्हता.
यावेळी नातेवाईक व मित्रांनी शोध घेऊनही तो सापडला नाही. सिसिटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता, तो तळघरातील जिना उतरून खाली जाताना दिसला. तेथे जाऊन पहिले असता, त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना समजताच त्यांनी घटना स्थळी भेट दिली. दरम्यान, आकाश काळे याचा कशामुळे मृत्यू झाला, याचा शोध पोलिस घेत असून, तो तळघरात कधी गेला यासाठी सिसिटीव्ही चे फुटेज तपासत आहेत.
आकाशच्या शरीरावर कुठेही जखमांचे व्रण दिसून आले नाहीत. मात्र, रात्रीपासून रुग्ण आपल्या बेडवरून उठून बाहेर गेल्यानंतर तो कुठे गेला हा प्रश्न डॉक्टर, कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांना पडला नाही का? अशी चर्चा सुरू आहे.