नाशिक : - लोकसभा मतदारसंघाचा वाद थेट दिल्लीच्या कोर्टात गेला मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीच्याच पारड्यात वजन पडल्याचे सांगितलं जात आहे.तर दुसरीकडे दोन वेळेस सलग खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांच्यासाठी शिवसेनेला जागा सुटणार असल्याचे गृहीत धरून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच गोडसेंनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.
उमेदवारी न मिळाल्यास वंचित आघाडी कडून चाचपणी सुरू केल्याचे देखील बोललं जातं आहे. विद्यमान खासदारांची बंडखोरी देखील महायुतीसाठी तापदायी मानली जात आहे. दरम्यान राज्यात महायुतीने काही जागांवर उमेदवार देखील जाहीर केले आहे.
हे ही वाचा :- नाशिक शहर दत्तक गेले, पुढे सात वर्षात काय झाले?
मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची देखील तयारी केली आहे मात्र महायुतीचा काही जागेचा तिढा अद्यापही कायम आहे त्यात नाशिकच्या जागेचा समावेश आहे नाशिक लोकसभा जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे मात्र या जागेसाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे अग्रयी आहेत या लोकसभेत मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यास खासदार हेमंत गोडसे बंडाची तयारीत असल्यास बोललं जाते.
गोडसे हे नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता देखील सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेवरून महायुती मधील तिढा कायम राहिलेला असून या मतदारसंघातील उमेदवारी मिळावी यासाठी खासदार हेमंत गोडसे हे आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते.
हेमंत गोडसे यांच्यासह दादा भुसे भाऊसाहेब चौधरी नाशिकचे पदाधिकारी हे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार होते. यावेळी गोडसे हे नाशिकच्या जागेबाबतचा 10 पाणी अहवाल हा मुख्यमंत्र्यांना देणार आहेत तर महायुती कडून नाशिकची जागा छगन भुजबळांना दिल्यास शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा बंड होण्याची शक्यता वर्तवली जाते तसेच पक्ष संघटन बांधणीवर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते.
नाशिक मधून भुजबळांची उमेदवारीला असलेला विरोध पाहता निवडून येण्यातही अडचणीला सामोर जावं लागू शकते तसेच भुजबळांची उमेदवारी महायुतीची एक जागा कमी होईल अशा अनेक मुद्द्यांचा समावेश अहवालत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे गोडसे यांची मुख्यमंत्र्यांबरोबरच चर्चा झाल्यानंतर गोडसे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचाच लक्ष लागलेलं आहे.