पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी दुचाकी आणि चार चाकी यांच्यात अपघातात सात वर्ष बालकाचा दुर्दैव मृत्यू सरांची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या आहेत राहुल पाटील हे त्यांचा मुलगा सत्यम याच्याबरोबर घराकडे जात होते.
त्याचवेळी त्यांची दुचाकीणी चार चाकी यांच्यात अपघात झाला यात सत्यम याला गंभीर दुखापत झाली त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं त्याचा मृत्यू झाला घटने नंतर अपघातस्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली घटनेची माहिती मिळतात
हे ही वाचा : - उमेदवारी न मिळाल्यास खा. हेमंत गोडसे बंडाच्या तयारीत??
इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी जखमींना जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले तर रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास आणि गुन्हा नोंदवण्याचे काम हे सुरू होतं अपघातात जो कुणी जबाबदार असेल तर संबंधित त्याचा शोध घेत त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी दिलेला आहे दरम्यान या रस्त्यावर असणाऱ्या अतिक्रमणांमुळे नेहमीच लहान-मोठे अपघात होत असतात
हे ही वाचा :- नाशिक शहर दत्तक गेले, पुढे सात वर्षात काय झाले?
नागरिकांची ओरड असून देखील पालिकेचं त्यावरती दुर्लक्ष होत आहे त्यामुळेच या बालकाचा बळी गेल्याचा आरोप या ठिकाणी गर्दी केलेल्या नागरिकांमधून केला जात होता या ठिकाणी मुख्य रस्त्यावर असणारे मच्छी मार्केट तसेच पथविक्रेते यांच्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते अपघातात एका सात वर्ष बालकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ व्यक्त केली जात आहे
आता तरी पालिकेने तत्परता दाखवत येथील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.