नाशिकमध्ये प्लॅस्टिक बंदीप्रकरणी १५० ठिकाणी तपासणी ; कारवाई ११ ठिकाणीच ..!

 नाशिक : प्लॅस्टिक विक्री आणि त्याच्या वापरा  संदर्भात  केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रलयाने  जारी केलेल्या अधिसूचनेचे पालन होत नसल्याप्रकरणी महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटकारल्या नंतर दुसऱ्याच दिवशी मनपा च्या घनकचरा व्ययवस्थापन विभागाने आपल्या विशेष पथकामार्फत बुधवारी दि.२७ कार्यवाही केली. 


हे  ही वाचा : एप्रिल ठरेल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हीट..


 मात्र पहिल्या दिवशी या पथकाने १५० दुकानांची तपासणी केली असता तरी केवळ ११ विक्रेते व वापरकर्त्यांवर कारवाई केली प्लॅस्टिक बंदी संदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग सहाही कारवाई करणार होता . मात्र प्रत्यक्षात पंचवटी व नवीन नाशिक या दोन विभागाकडे विशेष पथकाने पाठ फिरवल्याने आश्चर्य केले जात आहे .


शहरातील बहुतांश भागांमध्ये तसेच मुख्य बाजार पेठामध्ये  सरास पणे प्लॅस्टिक ची विक्री तसेच वापर सुरू आहे असे असताना महापालिकेच्या पथकांना हातांच्या बोटांवर मोजण्या  इतक्याच दुकानांमध्ये प्लॅस्टिक आढळून येणे शंकास्पदच मानले जात आहे तसेच पथकांना प्लॅस्टिक विक्री करणारे माहिती असूनही त्यांना अभय दिले जात असल्याचे सांगत किरकोळ विक्रेत्यांनी असंतोष व्यक्त केला आहे 


विभाग निहाय कारवाई अशी.. 

नाशिकरोड : ०३ 

नाशिक पश्चिम : ०५  

नाशिक पूर्व : ०२ 

सातपूर विभाग : ०१ 


महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्रा द्वारे महापालिकेची खरडपट्टी काढल्या नंतर आयुक्त डॉ. अशोक करंजकर आणि  अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी बैठक घेत घनकचरा व्ययवस्थापन विभागाचे संचालक डॉ . आवेश पलोड यांची मार्गदर्शनाखाली विभागनिहाय विशेष पथके तयार केली आहे या पथकांनी बुधवारी दि .  २७  शहरात १५० ठिकाणी तपासणी करीत केवळ ११ प्रकरणात ५५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यावरच समाधान मानले. 

होलसेल दरात तसेच प्रमाणात प्लॅस्टिक ची विक्री होत असलेल्या  ठिकाणांवर न जाताना किरकोळ विक्रेत्यांकडेच पथकांचा ओढा वाढत असल्याने मोठ्या विक्रेत्यावर  कोणाचे हात आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


Previous Post Next Post