नाशिक मध्ये वाजेंच्या उमेदवारीमुळे करंजकर संतप्त ; भुजबळांच्या नावाने गोडसे त्रस्त !

नाशिक : शिवसेना उबाटा गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून तयारीला लागलेल्या विजय करंजकर यांचे नाव डावलून बुधवारी (दि.२७) सिन्नर ची माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे करंजकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. करंजकर यांनी निवडणूक लढणार म्हणजे लढणार आणि पाडणार पण असे वक्तव्य करतानाच त्यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.

हे ही वाचा : प्लॅस्टिक बंदीप्रकरणी १५० ठिकाणी तपासणी ; कारवाई ११ ठिकाणीच ..!

 दुसरीकडे महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार हेमंत गोडसे यांच्या ऐवजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव राष्ट्रवादीकडून निश्चित झाल्याच्या चर्चेने त्रस्त झालेल्या गोडसे यांचे सह शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धाव घेतल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात नाशिकची राजकीय हवा चांगलीच तप्त झाली आहे.


हे  ही वाचा : एप्रिल ठरेल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हीट..


  •  बुधवारचे दिवस नाशिकच्या जागेच्या दृष्टीने वेगवान घडामोडींचा ठरला सकाळीच वाजेच्या उमेदवारीची घोषणा झाल्याचे समजतात भगूर आणि नाशिक रोड परिसरातील शिवसैनिकांनी करंजकर यांची निवासस्थान गाठून जोरदार घोषणाबाजी केली.                                                                                               
  •  ठाकरे गटात एकनिष्ठ राहणाऱ्यांना संधी मिळत नसेल तर पक्ष निश्चेचा काहीच उपयोग नाही अशी संताप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली तसेच भगूरच्या शहर प्रमुखांनी निषेध म्हणून पदाचा राजीनामा देखील देत रोष व्यक्त केला.                                                                                                                                       
हे ही वाचा : प्लॅस्टिक बंदीप्रकरणी १५० ठिकाणी तपासणी ; कारवाई ११ ठिकाणीच ..!

  •  त्यानंतर दुपारी करंजकर यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन मी 2014 आणि 2019 च्या लोकसभेवेळी इच्छुक असून पक्षाचा आदेश म्हणून थांबलो असलो तरी आता तिसऱ्यांदा थांबणार नसल्याचे जाहीर केले. नाशिकला झालेल्या अधिवेशनातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत तयारीची चौकशी करीत कामाला लागण्याची आदेश दिल्याचेही करंजकर यांनी नमूद केले.                                                                                                     
  • तेरा वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका अशा सर्व निवडणुका साम-दाम-दंड भेदजा वापर करून लढवल्या हे सर्व शिवसैनिकांना ज्ञात आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष असला तरी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असून येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे करंजकर यांनी जाहीर केले तर वाजे यांनी शिवसेनेच्या शालिमार येथील कार्यालयात बोलताना पक्षप्रमुखांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यात असल्याचे जाहीर केले.                                                                                                                     
  •  त्या कार्यक्रमाला घोलप गटासह शिवसेना उपनेते सुनील बागुल,विलास शिंदे यांच्या अनुपस्थितीची ही चर्चा झाली. त्यामुळे आता माझी माझी जिल्हाप्रमुखांचा असंतोष कसा समजतात तसेच नाशिक रोड, भगूरच्या शिवसैनिकांना कसे पक्ष कार्याला लावतात त्यावरच त्यांच्या प्रचाराची दिशा ठरणार आहे.

भुजबळ डार्क हॉर्स?
 उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली असताना अचानकपणे भुजबळ यांचे नाव चर्चेत येऊ लागले. तसेच साताऱ्याच्या उदयनराजे भोसले यांच्या जागेसाठी आग्रही असलेल्या भाजपला ती जागा देण्याच्या मोबदल्यात नाशिकची जागा शिंदे गटाकडून काढून भुजबळ यांना देण्याबाबतचा निर्णय पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीत झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे भुजबळांचे नाव अचानकपणे 'डार्क हॉर्स' सारखे उमेदवारीच्या शर्यतीत घुसून पुढे आले आहे. खासदार गोडसे आणि अन्य प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावरच थांबून होते.


Previous Post Next Post