नाशिक मध्ये पुन्हा एमडी (ड्रग्स) विक्री करणाऱ्याना दोघाणा पोलिसांनी ठोकल्या बेड्या.........

 नाशिक : अमली पदार्थ विक्री करणाऱ्या सशयीत फारूक शेख व महेश शिरोळे या दोघांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा यूनिट एकचे पोलिस अधिकारी व आमलदारांच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत चारचाकी वाहना सह सुमारे दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीसानी दिली.   


अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढत असताना गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार राजेश राठोड यांना संशयित फारूख शेख व महेश शिरोळे यांच्याकडे एमडी हा अमली पदार्थ असून, ते पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून म्हसोबा वाडी समोरील मनपा गार्डन, पंचशीलनगर, गंजमाळ, नाशिक या ठिकाणी एमडी (मॅफेड्रॉन) पावडर विक्री करण्याकरिता येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. 

हे ही वाचा : नाशिक मध्ये तब्बल सहा लाखांची वीज चोरी आले उघडकीस....

            त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार रमेश कोळी, देविदास ठाकरे, अंमलदार विलास चारोसकर, नितीन जगताप, मुकतार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, अनुजा येलवे, समाधान पवार यांच्या पथकाने सापळा लावून एमडी विक्री करताना संशयित फारूख सलीम शेख ( वय 33, रा. श्रमिक नगर, गंजमाळ), महेश उर्फनाना  दत्तात्रय  शिरोळे (वय 48, रा. हनुमान मंदीराजवळ, शिवाजीनगर,इगतपुरी)  यांना ताब्यात घेतले.

 त्यापैकी फारूख शेख यांच्या अंगझडतीत 15  हजार रुपये किमतीचे तीन ग्राम एमडी (मॅफेड्रॉन),  तसेच मोबाइल व  महेश दत्तात्रय  शिरोळे यांच्या अंगझडतीत  75 हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम एमडी (मॅफेड्रॉन), तसेच मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा दोघांच्या ताब्यातून एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

हे ही वाचा : राजकीय पक्षातील इच्छुकांना मराठा समाजाकडून मनाई....

            दरम्यान, दोन्ही संशयितांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post Next Post