नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील लेखानगर जवळ असलेल्या भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडविणे एका व्यावसायिक छायाचित्रकाराला महागात पडले आहे.

संशयित आरोपी पवन राजेश सोनी ( 29, रा. नागरेनगर ) या छायाचित्रकरविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळ फार्म परिसरात शुक्रवारी (दि. 5 सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ड्रोन ने घिरट्या घातल्या होत्या, यामुळे येथील सुरक्षारक्षकाना 'रेकी' चा संशय आला होता.
पेंढारकर कॉलनीत टोळक्यांचा धुडगूस ज्यूस विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला
येथील सुरक्षा अधिकारी दीपक मस्के यांनी अंबड पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत व सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख व अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी भुजबळ फार्म येथे भेट देऊन पाहणी केली होती.

याप्रकरणी भुजबळ यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. राऊत यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचा आदेश दिल होता. यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर शुक्रवारी सोनी यांनी विणपर्वण ड्रोन उड्डाण केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
गोदाकाठी नवोन्मेषा ची उभारली गुढी !
यामुळे ड्रोन उड्डाण नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कलम - 50 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ठाकूर यांनी दिली.