नाशिक : जेल रोड भागातील साने गुरुजीनगर येथील पेंढारकर कॉलनीत टोळक्याने धुडगूस घालत एका ज्यूस विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात फायटरसह धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने 22 वर्षीय तरुण जखमी झाला.

याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल चाफळकर, अभिनव कुर्हे, सागर सूर्यवंशी व त्यांचे आठ ते दहा साथीदार अशी हल्लेखोर संशयितांची नावे आहे.
गोदाकाठी नवोन्मेषा ची उभारली गुढी !
( वय 22, रा. महाजन हॉस्पिटल मागे, पेंढारकर कॉलनी, साने गुरुजीनगर) या व्यवसायिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. काकडे रविवारी (दि. 7) रात्री आपल्या राहत्या ठिकाणी दुकान सांभाळत असताना ही घटना घडली.
संशयित टोळक्याने परिसरात धुडगूस घालत काकडे यांना गाठून जुन्या वादाची कुरापत काढून त्यांच्यावर हल्ला केला. शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करीत टोळक्याने त्यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायटर व धारदार शस्त्राने वार केले.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात वारकऱ्यांकडून गुढीपाडवा साजरा..
या घटनेत काकडे जखमी झाले असून, संतप्त टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड करीत मोठे नकसान केले असून, अधिक तपास उपनिरीक्षक मंगेश गोळे करीत आहे.