नाशिक: हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणाऱ्या तडीपारास पोलिसांनी जेरबंद केले. संशयिताच्या अंगझडतीत गावठी पिस्तुलासह जीवंत काडतुसे असा सुमारे 25 हजार 500 रुपये किमतीचा एवज मिळून आला आहे.

ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या यूनिट 2 च्या पथकाने केली.वेदान्त संजय चाळगे (वय 19, रा. वेद मंदिरामागे, राहुलनगर, तिडके कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपाराचे नाव आहे. चाळगे यास शहर पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केलेले असतानाही त्याचा वावर शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिस त्याच्या मागावर असतानाच बुधवारी (दि. 10) तो चांडक सर्कल कडून तरण तलावाकडे जाणाऱ्या मार्गावरील विजय शासकीय वसाहत भागात वावरत असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन जाधव, हवालदार राजेंद्र घुमरे, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, परमेश्वर दराडे, विजय वरंदळ, संजय सानप,
मधुकर साबळे, अंमलदार विशाल कुवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले, सोमनाथ जाधव, तेजस मते व जितेंद्र वाजिरे आदींच्या पथकाने केली.