नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा गुढीपाडवा हा सण नाशिककरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त गुढ्या उभारून नव्या कामांना सुरुवात केली गेली. गुढी उभारण्यामागे अनेक आख्यायिका असल्या तिघांना तरी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुढ्या तांच्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा नाशिककरांनी पार पाडली.

गुढीपाडवा अनेक अर्थानी साजरा दाखल केला जातो. याच दिवशी ब्रह्माने सृष्टी श्रीराम निर्माण केली, श्रीरामाने रावणाचा वध साळवे केला व त्यांचे अयोध्येत आगमन झाले. याप्रीत्यर्थ अयोध्यावासीयांनी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला होता. याशिवाय गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होत असल्याने सर्वकाही मंगलमय आणि सुखकर होण्यासाठी गुढीपाडव्यापासून नवीन कार्याला सुरुवात केली जाते.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात वारकऱ्यांकडून गुढीपाडवा साजरा..
या पार्श्वभूमीवर अनेकांनी नवीन दुकाने, नवीन गाराचे उपक्रमांना सुरुवात केली. घरोघरी गुढ्या उभारून नवीन वर्षाचे स्वागत करताना दाम्पत्यांनी गुढीचे पूजन केले. यावेळी गुढीला गाठीकडे, फुलांचा हार, आंबे व कडुनिंबाच्या पानांचे डहाळे बांधण्यात आले. दुपारी पुरणपोळी, तसेच श्रीखंडाचा नेवैद्य दाखवून गुढी उतरविण्यात आली. निंबाची पाने किंवा निंबांच्या फुलांची जिरे, हिंग, गूळ घालून चटणी खाण्याचा प्रघात आजही अनेक घरांमध्ये पाळला जातो.
पूर्वी शाळांमध्ये गुढीपाडव्याला सरस्वती पूजन केले जात असे. ही परंपरा काहीशी नामशेष झाली असली तरी अनेक घरांमध्ये पाटीवर पेन्सिलीने सरस्वतीचे चित्र काढून पेन, पुस्तक, वही, पंचांग यांची हळद, कुंकू व फुलांनी पूजा करण्यात आली. शालिवाहन शकाला गुढीपाडव्यापासूनच सुरुवात होत असल्याने यावर्षीच्या क्रोधी नाम संवत्सराचे वर्षफल वाचन करण्यात आले.
शाळेतील दांडी मारून दिंडोरी गाठली इकडे पालकांची भंबेरी उडाली
अनेक मंदिरांमध्ये ब्रह्मवृंदाने पंचांग वाचन केले. शहरात अनेक ठिकाणी पंचांग वाटपही करण्यात आले.