नाशिक : एकीकडे आगामी लोकसभा निवडणुका तसेच सण उत्सव जयंती उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झालेला असून पोलिसांकडून सशस्त्र संचलन करत टवाळखोरांना एक प्रकारे सज्जन इशारा दिला जात आहे.
मात्र असा असताना देखील नाशिक मधील गुन्हेगारांकडून पोलिसांना वारंवार गुन्ह्यातून आव्हान निर्माण केलं जातं सिडकोतील त्रिमूर्ती नगर मध्ये भरवस्तीत रविवारी मध्यरात्री दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झालाय यामुळे एकच खळग उडाली दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकानं दुसऱ्याच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना घडलेली आहे.
पोहण्यास गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पाण्यात बुडून मृत्यू
वर्चस्वाच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयीतांना लागलीच ताब्यात घेतलं सिडकोत राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोघा सराईत गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाला दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली काही मित्रांच्या मदतीने हा वाद मिटला परंतु रात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे याने वैभव शिर्के यास बोलावून घेतलं आणि दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळला दर्शन दोंदेनं गावठी पिस्तूल करत वैभव वर रोखली असता.
जीव वाचवण्यासाठी वैभव यानीत्या ठिकाणाहून पलायन केलं दर्शननं त्याच्यावर पाठीमागून गोळीबार केला सुदैवानं नेम चुकला ना वैभव शिर्के या गोळीबारातून थोडक्यात वाचलेला आहे याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले आहे.
नेमकं तिकीट मिळणार तरी कोणाला.....?
दरम्यान दोघेही गुन्हेगार टोळक्यांचे सदस्य असून दोघेही गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झालेले होते या घटनेची गांभीर्याने देखल घेत आंबड पोलिसांनी कसून शोध घेत सहा संशयीतांना ताब्यात घेतलेला आहे.,