इयत्ता दहावीची परीक्षा संपल्यामुळे आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या ओम विजय शार्दुल या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सहा एप्रिल रोजी घडली.

अत्यंत होतकरू अशा या मुलाच्या मृत्यूमुळे महादेव नगर परिसरात शोककला पसरली आहे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते सातपूरच्या महादेव नगर परिसरात राहणारा ओम हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत होता.
नेमकं तिकीट मिळणार तरी कोणाला.....?
शाळेतून आल्यानंतर सातपूरच्या कमानी लगतच आपल्या आई-वडिलांसमवेत तो हातगाड्यावर चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करायचा मात्र दहावीची परीक्षा सुरू असल्याने पंधरा दिवसापासून त्यांचा हा व्यवसाय बंद होता परीक्षा संपल्यानंतर रविवारपासून पुन्हा व्यवसाय सुरू करू असं त्यांने आईला सांगितलं आणि तू शनिवारी आपल्या मित्रांसमवेत गंगापूर धरणाकडील पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता.

या ठिकाणी तो यापूर्वी चार ते पाच वेळेस पोहण्यासाठी गेलेला होता मात्र शनिवारचा दिवस त्याचा अखेरचा ठरला इथे पाणी कितपत आहे याचा अंदाज न आल्यानं खोलगट भागात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.
क्लास मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग......
त्याच्यासोबतच मित्रांना काही करण्याच्या आतच ही घटना घडली मासेमारी करणाऱ्या स्थानिक युवकाने त्याला पाण्याबाहेर काढलं त्याला तातडीने मोतीवाला होमिओपॅथी कॉलेजमध्ये नेण्यात आला मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला होता ओमच्या या आकस्मित मृत्यूमुळे महादेव नगर परिसरात शोककळा पसरली आहे.