पोक्सो अंतर्गत आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास

 नाशिक: सहा वर्षीय चिमुरडिस   घरात बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्ष सश्रम कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ही घटना गेल्या वर्षी पाथरवट  लेन   भागात घडली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे  लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला  होता. प्रकाश आबासाहेब ठोंबरे ( वय  43, रा. पाथरवट  लेन, पंचवटी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हे ही वाचा :-बैठकीमध्ये विजय करंजकरआणि माजी आमदार योगेश घोलप यांनी मारली दांडी.....

ठोंबरे याने 10 ते 14 जुलै दरम्यान अंगणात खेळणाऱ्या सहा वर्षीय बलिकेस आमिष दाखवून आपल्या घरात बोलावून घेत हे कृत्य केले होते. ही बाब निदर्शनास येताच पीडितेच्या आईने याबाबत पोलिसात धाव घेतल्याने याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक मिथुन परदेशी यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायलयात सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र. 5 च्या न्या. पी. व्ही. घुले यांच्या समोर चालला. सरकारतर्फे अॅड. लीना चव्हाण यांनी काम पहिले.

हे ही वाचा :- 'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्याला बेड्या कृषिनगर जॉगिंग ट्रॅकजवळ घेतले ताब्यात

फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेल्या साक्षी आणि तपासी अधिकाऱ्यानी सादर केलेल्या परिस्थितीजन्य  पुराव्यास अनुसरून न्यायालयाने आरोपीस बालकाचे  लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 चे कलम 6 मध्ये दोषी ठरवत 20 वर्ष सश्रम कारावास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा असे निकालपत्रात  नमूद केले आहे.

Previous Post Next Post