नाशिक : आयपीएल क्रिकेट मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेत विविध संघांमध्ये खेळविल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. कृषिनगर जॉगिंग ट्रॅकजवळ अशाच एका युवकाला गुन्हे शाखेच्या विशेष पंथकाने सट्टा लावताना रंगेहाथ ताब्यात घेतले.
महेंद्र वैष्णव (३४, रा. तारवालानगर) असे संशयित युवकाचे नाव आहे.बुधवारी (दि. ३) कोलकाता (केकेआर) व दिल्ली (डीसी) या दोन संघांमध्ये सामना खेळविला गेला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्याच्या वेळी महेंद्र हा बेटिंग लावत असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकातील पोलिस नाईक दत्तात्रय चकोर यांना मिळाली.
हे ही वाचा :- नाशिकरोड परिसरात पोलिसांचे शक्तिप्रदर्शन....
पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या पथकाने तत्काळ कृषिनगर जॉगिंग ट्रॅकच्या परिसरात साध्या वेशात सापळा रचला.बुधवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणाहून संशयित महेंद्र यास बेटिंग लावताना रंगेहाथ पकडले.
त्याच्याकडून मोबाइल, रोकड व कार असा १६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तो या सामन्याचे थेट प्रक्षेपण बघून बेटिंग लावत सट्टा खेळत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा :- जागा डेवलपमेंट करार करण्याकरता 28 कोटींची फसवणूक....
त्याला पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.