भुजबळांनी भरली तब्बल साडेसहा कोटींची थकबाकी......

 नाशिक : अन्न व नागरी पुरवठामंत्री  छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा रंगत असतानाच भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या 'ऑर्मस्ट्रॉग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या माध्यमातून साखर कारखान्यानेही नाशिक जिल्हा बँकेची साडेसहा कोटींची थकबाकी भरली आहे.

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या या कारखान्याकडे ५१ कोटी ६६ लाखांची थकबाकी आहे. कारखान्याचे संचालक मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ आणि पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना बैंक प्रशासनाने नोटीस बजावली होती.

हे ही वाचा :-बैठकीमध्ये विजय करंजकरआणि माजी आमदार योगेश घोलप यांनी मारली दांडी.....

 बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी साखर कारखान्याला भेट देत नोटीस बजावली होती. त्यानंतर भुजबळ कुटुंबाने जिल्हा बँकेकडून वन टाइम सेटलमेंट योजनेत थकबाकी भरण्यासाठी अर्ज केला होता. कारखान्यास नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३० कोटींचे कर्ज दिले होते.

समान चार हप्त्यांत परतफेड कर्जाच्या वाढत्या थकबाकीमुळे काही वर्षे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बँकेने वसुलीसाठी बड्या थकबाकीदारांकडे मोर्चा वळवला आहे. ऑर्मस्ट्रॉग कारखान्याकडील ५२ कोटींच्या थकबाकीपैकी निम्मी रक्कम माफ करण्यात आली असून समान चार हप्तांमध्ये उर्वरित २६ कोटीची रक्कम फेडावयाची आहे.

हे ही वाचा :- 'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्याला बेड्या कृषिनगर जॉगिंग ट्रॅकजवळ घेतले ताब्यात

त्या अनुषंगाने सहा कोटी ५० लाखांचा पहिला हप्ता कंपनीने बँकेस दिला आहे.

Previous Post Next Post