क्लास मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग......

 नाशिक: येथील एका खासगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींना  आमिष दाखवून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन संशयिता विरोधात विनयभंग आणि पोस्को  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 26 मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास लासलगाव येथील एक खासगी क्लासमध्ये  पीडित  विद्यार्थीनिना 'तुम्हाला शाळेचे पेपर दाखवतो' असे आमिष दाखवून संशयितांनी त्यांच्याशी जवळीक साधत दोघीचाही  विनयभंग केला.

हे  ही वाचा : एप्रिल ठरेल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हीट..

याप्रकरणी महेबूब शेख (रा. टाकळी विंचूर, ता. निफाड) व सुमित संजय भडंगे (रा. गणेशनगर, लासलगाव) या  संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुरासे  करीत आहेत.

दरम्यान, अशाप्रकारच्या घटनाविषयी अन्य पालक अथवा विद्यार्थीनिच्या तक्रारी असल्यास त्यांनी लासलगाव पोलीसाशी  संपर्क साधावा, असे आव्हान सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी केले आहे.

 

Previous Post Next Post