युवा मतदार ठरवणार नाशिक जिल्ह्यातील खासदार!

 नाशिक: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, नाशिक व धुळे या तीन लोकसभा मंतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता इच्छुक  मतदारांची आकडेमोड करण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा :-  नाशिक लोकसभेमध्ये शिवसेना की राष्ट्रवादी कॉँग्रेस ??? तिढा अजून काही सुटेना ..!

नाशिक जिल्ह्यातील एकूण 47 लाख 48 हजार मंतदारांपैकी 31 लाख 42 हजार  ( 66 टक्के ) मतदार हे पन्नासच्या आत  असल्यामुळे युवा मतदारच उमेदवाराचे राजकीय भवितव्य ठरवणार आहे.  लोकसभा निवडणुकीत नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे.

 त्यादृष्टीने राजकीय मोर्चेबांधणी आत्तापासून सुरू झाल्याचे दिसून येते. नेत्यांनी मतदारसंघाचे दौरे सुरू केले आहेत, तर काही ठिकाणी अजूनही उमेदवारीचा खल चालू आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महायुतीत  अद्याप या जागेचा तिढा कायम आहे.

हे ही वाचा :- वयोवृद्ध महिलेचे चोरी झालेले बावीस तोळे सोने हस्तगत!

नाशिकवर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप कडून दावा करण्यात आला आहे. भाजपकडून दिंडोरीसाठी  विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे, तर याच मतदार संघात राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून भास्कर भगरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांसह  इच्छुक उमेदवारांनी आता मतदारांची आकडेमोड करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये  24 लाख 74 हजार पुरुष, तर 22 लाख 73 हजार महिलांचे प्रमाण आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या गुणोत्तराचा विचार केल्यास कळवण-सुरगाणा या आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात संघात सर्वाधिक आहे. येथे एक हजार पुरूषांमागे  965 इतक्या महिला आहेत, तर सर्वात कमी प्रमाण नाशिक पश्चिम या शहरातील मतदारसंघात दिसून येते.

हे ही वाचा : उमेदवारी निश्चित नसताना हेमंत गोडसे यांच्या प्रचारास प्रारंभ..!

इथे केवळ 858 इतके लिंग  गुणोत्तर आहे. तृतीयपंथी मतदारांच्या नाव नोंदणीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायटया यांचे सहकार्य घेतले. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष    गुणोत्तर 913 वरुण 919 इतके वाढले आहे.

वाढलेल्या मतदारांमध्ये नवमतदारांचे प्रमाणही अधिक आहे. दोन लाख 14 हजार नवमतदारांची नोंदणी करण्यात आली असून, 18 ते 22 वयोगटातिल हे मतदार आहेत. 66 टक्के मतदार हे पन्नासच्या आतील असल्यामुळे त्यांच्याचहाती  निवडणुकीचा निकाल असणार आहे. 

Previous Post Next Post