नाशिक : लोकसभेची नाशिकची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी, असा पदाधिकार्यांचा आग्रह आहे. यावर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील. नाशिकमध्ये सर्वाधिक नगरसेवक भाजपचे असून, तीन आमदार आहेत.
त्यामुळे नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद जास्त आहे. भाजपला उमेदवारी मिळाल्यास उमेदवार नक्कीच निवडून येईल, असा दावा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये केला आहे. नाशिक लोकसभा मंतदारसंघाच्या उमेदवारीबाबतचा पेच महायुतीत अद्याप कायम आहे.
हे ही वाचा :- नाशिक लोकसभेमध्ये शिवसेना की राष्ट्रवादी कॉँग्रेस ??? तिढा अजून काही सुटेना ..!
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनीही नाशिकची जागा लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
एकीकडे नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असतानाच दुसरीकडे रविवारी नाशिक भाजपच्या वसंत स्मृति कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पर पडली. या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभेचा आढावा घेण्यात आला .
हे ही वाचा :- वयोवृद्ध महिलेचे चोरी झालेले बावीस तोळे सोने हस्तगत!
या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती होती. नाशिकची जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी नाशिकच्या पदधिकारींनी यावेळी केली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना विखे यांनी नाशिकच्या जागेबाबत भाजपचे पदाढीकरिच आग्रही असल्याचे सांगत या जागेबाबत चिंता करण्याचे कारण नाही.
पाचव्या टप्यातील निवडणूक मे महिन्यात आहे. महायुतीमध्ये क्षमता जास्त आहे. लोकप्रियता आहे. नेतेमंडळी समर्थ आहेत, असे त्यांनी सांगितले. दिल्लीतील बैठकीत नाशिकच्या उमेडवरबाबत माझ्या नावाची चर्चा झाली. असे म्हणत ना. छगन भुजबळ यांनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत.
हे ही वाचा :- युवा मतदार ठरवणार नाशिक जिल्ह्यातील खासदार!
यावर विखे पाटील म्हणाले की, त्यांना दिललीवरून काय सांगितले, याची आम्हाला कल्पना नाही. आम्ही ग्राउंड लेव्हलला काम करणारे आहोत. महायुती जो उमेदवार देईल, त्याचे आम्ही काम करू, असे ते म्हणाले.