लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघात अजूनही रस्सीखेच सुरूच आहे नाशिक लोकसभेच्या जागेचा किडा अध्यापही सुटलेला नाहीये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून नाशिकच्या जागेवर दावा केला जात आहे.
शिवसेनेकडून हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी कडून छगन भुजबळ यांच्यात रस्ते सुरू असताना भाजपला देखील आता त्यात उडी घेतली आहे.
हे ही वाचा : नासिक रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 व्या जयंतीनिमित्त! 18 तास अभ्यास अभियान.....
दरम्यान उमेदवारी जाहीर करण्यासाठी दोन दिवसापासून मुंबईत तळ ठोकून असलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह काल नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
उमेदवारी मिळेल की नाही मिळणार याबाबत अजून निश्चित नसतानाच हेमंत गोडसे यांनी शालिमार चौकात असलेल्या हनुमान मंदिरात आणि काळाराम मंदिरात दर्शन घेत अभिषेक करत आरती करत आपल्या प्रचाराला प्रारंभ केलेला आहे.
हे ही वाचा : नाशिक मध्ये रंग बरसे; नाशिककरांनी लुटला आनंद.....
यावेळी त्यांनी हनुमान चरणी पत्र अर्पण करत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून ढोल ताशांच्या गजरात रंगांची उधळण करत हेमंत आप्पा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलेला आहे.
शिवसेनेला सुटेल असा विश्वास आणि खात्री व्यक्त करत हेमंत गोडसे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे उमेदवारी निश्चित नसताना देखील शक्ती प्रदर्शन करत हेमंत गोडसे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या प्रचारास प्रारंभ केलेला आहे.
हे ही वाचा : अंबड एमआयडीसी मध्ये औद्योगिक वसाहतीत लूटमार करणाऱ्यांना पोलिसांच्या बेड्या.....
आज काळा रामाचं तसंच हनुमानाचे दर्शन घेत शक्तिप्रदर्शनाद्वारे हेमंत गोडसे यांनी आपल्या प्रचारास प्रारंभ केलेला आहे.