नाशिक :- लोकसभा मतदारसंघातन महायुतीचा उमेदवार कोण हा तिढा अजून तरी सुटलेला दिसत नाही. पण असं असलं तरी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार असलेले मात्र त्यांचा प्रचार आता सुरू केल्याचं पाहायला मिळतात. तर दुसरीकडे छगन भुजबळ देखील आता निवडणूक लढवायला तयार झाल्याचं पहायला मिळतात.
हे ही वाचा :- वयोवृद्ध महिलेचे चोरी झालेले बावीस तोळे सोने हस्तगत!
शिवसेनेचे पहिल्या यादी हेमंत गोडसेंना स्थान न मिळाल्याने ही जागा शिवसेनेकडे राहणार की राष्ट्रवादी काँग्रेस कडे जाणार हा पेच निर्माण झालाय. त्यातच शुक्रवारी मुंबई तळ ठोकून असलेल्या हेमंत गोडसे यांची भेट मुख्यमंत्र्यांनी टाळली अशी चर्चा होते. पण त्यानंतर आता हेमंत गोडसेंनी मोठा निर्णय घेत शनिवारी थेट प्रचाराला सुरुवात केल्याचं बघायला मिळालं.
हे ही वाचा :- नासिक रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 व्या जयंतीनिमित्त! 18 तास अभ्यास अभियान.....
शक्ती प्रदर्शन कुठल्याही प्रकारचा शक्ती प्रदर्शन नाहीये. आज या ठिकाणी आपला शुभारंभ होतोय आणि सर्वच आम्ही शिवसैनिक शिवसेनेने केलेली काम ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं शुभारंभ या ठिकाणी सुरू केला आहे.
नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेची की राष्ट्रवादी काँग्रेसची हा पेज कायम असतानाच गोडसेंनी प्रचाराला सुरुवात केली. खरी पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनही नाशिकच्या जागेवर दावा केल्याचं दिसतंय. आधी नाही म्हणणाऱ्या छगन भुजबळांनी ही शनिवारी लोकसभा उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले.
हे ही वाचा :- उमेदवारी निश्चित नसताना हेमंत गोडसे यांच्या प्रचारास प्रारंभ.......
एकंदरीतच दोन दिवसांच्या मुंबई मुक्कामानंतर नाशिक मध्ये आलेल्या हेमंत गोडसेंनी आता निवडणूक लढवण्याचा चंगच बांधण्याच दिसतंय. त्याचवेळी ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर आता भुजबळही मैदानात उतरायला सज्ज झालेले आहे.
महायुतीत बंडखोरी होण्याची चिन्ह आहेत हा तिढा महायुतीचे नेते नेमका कसा सोडवतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.