नाशिक मधील कामगार नगर येथील गुलमोहर कॉलनी येथे युवकाची हत्या..!

नाशिक: सातपूर परिसरातील कामगार नगरमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे.  कामगार नगर मधील गुलमोहर कॉलनी परिसरात एका 19 वर्ष तरुणाचा तीक्ष्ण हत्यारानं वार करून खून केल्याचा खळबळजनक प्रकार आज सकाळच्या सुमारास उघडकीस आला आहे.

या कुणाच्या घटनेने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरलं.  सातपूर परिसरातील गुलमोहर कॉलनी मधील कौशल्य बिला या बिल्डिंग मधील फ्लॅट क्रमांक एक मध्ये राहणारा 19 वर्षे युवक महेंद्र सिंग याची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केल्याची खळबळ जनक घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आलेली आहेत. 

हे ही वाचा :- नाशिकच्या जागेसाठी भाजपही आग्रही ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य..!

हा युवक नेपाळ येथील राहणार असून तो कामगार नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये कुकिंग काम करत असल्याची माहिती समोर आलेली आहे.  तसेच ह्या युवकाची हत्या कोणत्या कारणातून झाली.  हे अद्याप समजू शकले नाही याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे. 

हे ही वाचा :- युवा मतदार ठरवणार नाशिक जिल्ह्यातील खासदार!

या घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झालेले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय.

Previous Post Next Post