नाशिकरोड परिसरात पोलिसांचे शक्तिप्रदर्शन....

नाशिक : आगामी गुढीपाडवा, रमजान ईद, संत झुलेलाल जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, भगवान महावीर जयंती, हनुमान जन्मोत्सव आदी सण, उत्सव एकापाठोपाठ सलग पुढील आठवड्यात साजरे केले जाणार आहेत.

तसेच लोकसभा निवडणुकीचेही बिगुल वाजले आहे. यामुळे शहरासह उपनगरांमध्ये कोठेही कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, या उद्देशाने नाशिकरोड, देवळाली गाव भागात गुरुवारी (दि. ४) पोलिसांनी सशस्त्र संचलन करत समाजकंटकांना इशारा दिला आहे.

हे ही वाचा :- जागा डेवलपमेंट करार करण्याकरता 28 कोटींची फसवणूक....

उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, रणजित नलावडे, सचिन चौधरी यांच्यासह जलद प्रतिसाद पथकाचे (क्युआरटी) सशस्त्र कमांडो, दंगल नियंत्रण पथकाचे (आरसीपी), जवानांसह पोलिस अंमलदारांचा मोठा फौजफाटा वाहनांसह नाशिकरोड भागात रस्त्यावर अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले.

सायंकाळी देवळाली गावातील महात्मा गांधी पुतळा येथून संचलनाला प्रारंभ करण्यात आला, गाडेकर मळा, जैन भवनमार्गे आर्टिलरी रोडवरून अनुराधा टॉकीज, महात्मा गांधी रोड, मुक्तिधाम आदी भागातून पोलिस सायरन वाजवत पथसंचलनाद्वारे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. 

Previous Post Next Post