चांदवड :- येथील मुंबई अग्रा महामार्गावरील राहूड घाटाजवळ बस बंद पडल्याने बसमधील रेडिएटर तपासताना गंभीरित्या भाजलेल्या बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार 18 मार्च रोजी चांदवड येथील राहुड घाटात जवळील एसटी बस क्रमांक MH-06-BDW-1235 ही बंद पडल्याने बस चालक संजय कृष्णा काकूळते हे रेडिएटर मधील कुलंड ची तपासणी करत असताना अचानक कुलंड मधील गरम पाणी त्यांच्या अंगावरून उडाले.
हे ही वाचा :- निधी मिळूनही ११० गावे राहणार पाण्यापासून वंचित...
यात त्यांच्या मानेवर छातीवर पाठीवर आणि दोन्ही हातावर भाजल्याने ते गंभीररित्या जखमी झाले.
त्यांना तातडीने औषध उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना इंदिरानगर नाशिक येथील खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आला तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे.
हे ही वाचा : - तलवार धारी अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात.....
याबाबतची कागदपत्रे इंदिरानगर पोलीस ठाण्याकडून चांदवड पोलिसांना प्राप्त झाल्यानं पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केली आहे.