जागा डेवलपमेंट करार करण्याकरता 28 कोटींची फसवणूक....

नाशिक :- जागा डेवलपमेंट करार करण्याकरता 28 कोटी रुपये घेत जागा विकसित न करता ती परस्पर दुसऱ्या व्यवसायिका सोबत करार करून फसवणूक केल्याप्रकरणी राठी अमराई जागामालक विजय राठी यांच्यासह त्यांच्याच कुटुंबातील नऊ जणांनी विरोधात सरकारवडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

रात्री उशिरा विजय राठी यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याची माहिती उपयुक्त प्रशांत बच्छाव यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती आणि विजय बेदमूता यांच्या तक्रारीनुसार तीन भागीदारांची स्पेस सिनर्जी कंपनी आहे.

हे ही वाचा :- रेडिएटर तपासताना भाजलेल्या चालकाचा दुर्दैवी मृत्यू......

विजय राखी यांच्यासोबत बालपणापासूनच ओळख होती 2008 मध्ये राठी यांनी कुटुंबांची एकत्रित मिळकत राठी अमराई जागा विकसित करावयाचे आहे असे सांगितले राठी यांच्यासह नऊ जणांसोबत जागेचा विकसन करारनामा करत 2015 पर्यंत 18 कोटी रक्कम देण्यात आली तसेच राठी आणि कुटुंबांना एक कोटी 41 लाख 55 हजार रक्कम मेंटेनन्स साठी देण्यात आले.

या सह प्लान मंजूर एग्रीमेंट कर्ज मंजुरीसाठी 8 कोटी 62 लाख असे 28 कोटी दहा लाख बारा हजार रक्कम 2008 ते 2017 पर्यंत देण्यात आली 2012 मध्ये डेव्हलपमेंट एग्रीमेंट दस्त ही नोंदवले गेले मिळकत रायस्टला विक्री करता येणार नाही असं न्यायालयाचे आदेश असताना देखील संशयित राखी यांनी एका बांधकाम व्यवसाय सोबत डेव्हलपमेंट करारनामा करत घेत फसवणूक केल्याचा तक्रार म्हटलेला आहे. 

हे ही वाचा :- निधी मिळूनही ११० गावे राहणार पाण्यापासून वंचित...

फिर्यादी वरून विजय राखीनसह कुटुंबातील नऊ जणांवर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला 

Previous Post Next Post