गुढीपाडव्यापर्यंत सोन्याचा भाव ७५ हजारांवर पोहचणार

 नाशिक:  जागतिक बाजारातील घडामोडीमुळे  सोन्याचा दर दाररोज नवा  उच्चांक गाठत  आहे. सोमवारी (दि.१ ) सकाळच्या सत्रात सोने दराने प्रतिदहा ग्रॅम ७२ हजारांचा जिएसटीसह  पल्ला गाठला. 

आगामी काळात गुढीपाडवा व अक्षय्यतृतीया या सणांच्या  पार्श्वभूमीवर सोन्याचे दर ७५ हजार रुपयांचा टप्पा पार करणार असल्याचा अंदाज सराफ व्यवसायिकांनी  वर्तविला आहे.

हे ही वाचा :- नाशकात अमित शाह, शिंदे, पवार, ठाकरेंची होणार सभा......

या दरवाढीमुळे आगामी काळात होणाऱ्या विवाह समारंभाला लागणाऱ्या दागिन्यांची खरेदी कशी करावी, असा पेच वधूपित्यानं पडला आहे. सोन्याच्या दरात वर्षभरात आठ हजार रुपयांची, तर एकट्या मार्च महिन्यात पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे.



वर्षभरात सोने दरात वाढ

१. गतवर्षी एप्रिल महिन्यात सोने प्रतितोळा ६१ हजार ३८० रुपये होते. तर मे महिन्यात हा दर ६२ हजार  ५०० वर गेला. यंदाच्या मार्चच्या सुरुवातीलाच सोने ६५ ५ हजार पार जाऊन दुसऱ्या आठवड्यात ६५ हजार ८०० आणि मार्च अखेर ६८ हजार ८०० वर पोहचले. 

हे ही वाचा :- कुंभमेळयासाठी नियोजन: भाविकांच्या गर्दीसह स्वच्छतेबाबद सादरीकरण प्रयागराजच्या धर्तीवर होणार नियोजन.....

२. एप्रिल च्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दराने ७० हजारांचा  पल्ला गाठला. त्यामुळे गुंतवणूकदारांना   भरघोस परतावा मिळत असला, तरी लग्नसराईच्या वेळेस वधू - वरांचे पालक मात्र धास्तावले आहेत. 

हे ही वाचा :- शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभा लढवण्यावर ठाम ; संजय राऊत यांची प्रतिक्रिया .......

३. महिन्याच्या सुरुवातीला असलेला ६५ हजार रुपये तोळा हा दर सोमवारी (दि. १ ) जवळपासस ७० हजार रुपयांच्या घरात गेला. सध्या २२ कॅरेटचे सोने ६५ हजार, तर २४ कॅरेटचे सोने ७१ हजार ५०० रुपयापर्यंत पोहचले  आहे. 

Previous Post Next Post