नाशिक: शहरात २०२७-२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थांच्या पाश्वभूमीवर महापालिकेकडून नियोजनस प्रारंभ करण्यात आला असून प्रयाग राज येथे २०१९ मध्ये झालेल्या कुंभपर्वच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे पर्वणीच्या दिवशी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण कसे ठेवावे. साफसफाई आणि विविध कामाची माहितीचे ऑनलाइन सादरीकरण मंगळवारी महापालिकेत दाखविण्यात आले. याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.
महापालिकेने आगामी सिहस्थ कुंभमेळा तयारीला सुरुवात केली असून भविकाची गर्दी द त्यांचे नियोजन या विषयावर फोकस केला आहे. त्याच अनुषगाने यंग फ्रेंडस असोसिएशन या संस्थेने महापालिकेस प्रयागराज या ठिकाणी केलेल्या कुंभमेळा नियोजनाचे सादरीकरण केले.
हे ही वाचा :- नाशकात अमित शाह, शिंदे, पवार, ठाकरेंची होणार सभा......
या अगोदर देखील दोन ते तीन संस्थानी कुंभमेळयाच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण केले आहे. आचार संहिता संपुष्टात आल्यानंतर कुंभमेळा नियोजनासाठी कोणत्या संस्थेसोबत काम करावे, याचा निर्णय घेतला जाणार आहे.
१. कुंभमेल्यासाठी महापालिकेकडून प्राथमिक शासणानेही समित्या गठित केल्याने कामाला उशिराने का होईना गती आली आहे. महापालिकेने सिहस्थासाठी एकूण अकरा हजार कोटीच्या विकास कामाचा प्रारूप आराखडा तयार केला आ
हे. सिहस्थात नाशिकला दोन कोटी भाविक व पर्यटक येण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा :- शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभा लढवण्यावर ठाम ; संजय राऊत यांची प्रतिक्रिया .......
२. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या गर्दीचे नियोजन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. यंग फ्रेंडस असोसिएशन ने प्रयागराज या ठिकाणी झालेल्या कुंभमेळयात गर्दीचे नियोजन केले होते. त्यात प्रामुख्याने रोगराई पसरू नये या साठी साफसफाई, आरोग्य सुविधा, पर्वणीच्या दिवशी होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था याबाबत सूचना दिल्या आहेत.