नाशिक :- नातेसंबंधातील ओळखीचा फायदा घेत शाळेत घ्यायला येण्याच्या बहाण्याने पीडित अल्पवयीन शाळकरी मुलीच्या मावशीच्या चुलत दिरानच तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत पांडवलेणी जवळ एका उद्यानात घेऊन जात मागील वर्षी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भवती केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे.
यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात वीस वर्षाच्या आरोपी काका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पीडित शाळेमध्ये गेल्यावर शनिवारी अर्धा दिवस शाळा असल्याचा फायदा घेत आरोपी काका हा तिला शाळेत घेण्यासाठी जात होता.
हे ही वाचा :- गुढीपाडव्यापर्यंत सोन्याचा भाव ७५ हजारांवर पोहचणार...
यानंतर तो पिढीतेला दुचाकीवरून पांडवलेणी भागातील जंगलात फिरवण्याच्या बहाण्याने घेऊन जात. तिथे वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा फिर्यादीत म्हटले 29 मार्च 2024 साली पीडित अल्पवयीन मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागलं. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल. त्यावेळी तेथील गर्भावती असल्याचा समोर आल.
तिने एका स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिलेला आहे आईने तिला विश्वासात घेऊन बाळंतपणाबाबत विचारलं असता तिने घडलेल्या प्रकार कथन केला. आरोपिने तिला धमकावून ठेवत कोणालाही याबाबत सांगू नको असं सांगितलेलं होतं. तिने या प्रकरणी वाचता केल्या असं फिर्यादीत म्हटलेलं आहे.
हे ही वाचा :- नाशकात अमित शाह, शिंदे, पवार, ठाकरेंची होणार सभा......
याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी पीडितेच्या आईने फिर्याद दिलेली आहे. नात्यातील वीस वर्षीय आरोपी विरुद्ध बलात्कार बालकाचे लैंगिक अपराधपासून संरक्षण अधिनियमांतर्गत प्रोक्सो संशयित आरोपीचा इंदिरानगर पोलीस शोध घेत आहेत.