नाशिक : चैत्र उत्सवात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी वणी येथील सप्तशृंगी गडावर येत असतात. आणि याच भाविकांच्या वाहतुकासाठी एसटी महामंडळाच्या वतीने नियमित बसेस बरोबरच इलेक्ट्रिक बसेस ची सुविधा 1 एप्रिल पासून म्हणजेच आज पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
नाशिकचे सप्तशृंगी गड या मार्गावर इलेक्ट्रिकल बससाठी 170 रुपये प्रति प्रवासी भाडे दर असणार आहेत. एसटी महामंडळाची वतीने प्रदूषण टाळण्यासाठी टप्पाटप्प्याने विविध मार्गांवर इलेक्ट्रिकल बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत.
हे ही वाचा :- नाशिक मधील कामगार नगर येथील गुलमोहर कॉलनी येथे युवकाची हत्या..!
सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सवाची यात्रा लक्षात घेता या मार्गावरील भाविकांची संख्या वाढणार आहे. आणि याचमुळे एक एप्रिल पासून नाशिक ते सप्तशृंगी गड या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर दोन बसेसच्या सहा फेऱ्या अशा एकूण बारा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.
संपूर्ण वातानुकूलित तसेच पर्यावरण पूरक बसेस सकाळी पाच वाजले पासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत जुन्या सीबीएस बस स्थानक येथून सुटतील या बसेस मध्ये पाच ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना अर्ध्या तिकड्याची सवलत लागू असणार आहे. एस टी च्या विविध सवलती देखील या बसेस साठी लागू असतील पर्यावरण पूरक बसेसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत.
हे ही वाचा :- नाशिकच्या जागेसाठी भाजपही आग्रही ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य..!
सप्तशृंगी गडासाठी लाल परी बसची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. यासाठी प्रति प्रवासी भाडे जर 115 रुपये फुल तिकीट तर हा तिकीट 60 रुपये इतका असेल तर इलेक्ट्रिक बस साठी फुल भाडे प्रति प्रवासी 170 रुपये असणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.