नाशिक शहर दत्तक गेले, पुढे सात वर्षात काय झाले?

 नाशिक: राज्यातील एखाद्या शहराला पितृछाया लाभली की, त्या शहराचा विकास झटकन होतो, हे पुणे, नागपूरसह अनेक शहरांच्या बाबतीत झाले आहे. नाशिक मध्येही असाच प्रकार घडला होता. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतले होते.

त्यानंतर सार्वजनिक बस वाहतूक सुविधा सक्षम करण्याबरोबरच  अमृत योजना आणि कायमस्वरूपी सिसिटीव्ही असे काही प्रकल्प चर्चेत आहे.काही प्रकल्प पूर्ण झाले, तर काही प्रकल्प अद्याप सरकार दरबारी पडून आहेत. विशेषत: निओ मेट्रो प्रकल्पाची घोषणा अद्याप अमलात आली नाही.

हे ही वाचा :- खा. हेमंत गोडसे भेटणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना..........मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गोडसेंच्या भूमिकेकडे लक्ष......

नाशिक महापालिकेत लोकप्रतिनिधीची राजवट लागू झाल्यानंतर 1992 ते 2012 पर्यन्त कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिकेत सत्ता द्या, मी नाशिक दत्तक घेऊन विकास करून दाखवतो, असे सांगितले होते. 

मुळात नाशिकला अपेक्षित राजकीय नेतृत्व नाही आणि राजकीय इच्छाशक्तिअभावी नाशिकला नवीन प्रकल्प येत नाहीत. उलट आहेत, तेच प्रकल्प पळवले जातात, अशी एक समजूत आहे. त्यामुळेच फडणवीस यांच्या विधानाचा इम्पॅक्ट  झाला आणि नाशिक महापलिकेच्या इतिहासात प्रथमच एक पक्षाला बहुमत मिळाले.

हे ही वाचा :- गोडसे वेटिंग वर ; प्रचाराची लगिनघाई!

भाजपचे एकूण 66 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे एकहाती विकासाची मोठी संधी निर्माण झाली. नाशिक महापालिकेच्या या सत्ता कालावधीत सार्वजनिक बससेवा हा महत्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नाशिक शहरातील बस सेवेत तोटा होतो म्हणून जवळपास सर्वच बस बंद केल्या होत्या आणि दुसरीकडे महापालिकेची सेवा घोळात होती.

अखेरीस सिटीलींकच्या माध्यमातून ही सेवा सुरू झाली. अर्थात सेवा चांगली असली तरी एकाच वर्षात आठ वेळा वाहकांचा संप होत असल्याने प्रवाशाना बसच्या भरवशावर प्रवास करावा की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. 

हे ही वाचा :- देवळाली कॅम्प मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती कार्यालयाचे उद्घाटन संपन्न......

गोदावरी शुद्धिकरणसाठी अमृत योजना तसेच पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव योजना अशा प्रकल्पना मंजूरी मिळाली. नाशिकमध्ये 2014-15 मध्ये कुंभमेळा झाला तेव्हा सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरते भाड्याचे कॅमेरे घेण्यात आले.

हे ही वाचा :- नाशिक मधील कामगार नगर येथील गुलमोहर कॉलनी येथे युवकाची हत्या..!

त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये कायम स्वरूपी सिसिटीव्ही बसवण्याची घोषणा केली होती. आता ती कार्यवाहित  असली तरी अद्याप सिसिटीव्ही मात्र कार्यान्वित होऊ शकले नाहीत..

Previous Post Next Post