नाशिक : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाबाबत महायुतीतील तिढा अद्यापही सुटलेला नाही. नाशिकची जागा कोणत्या पक्षाला मिळणार, याविषयी राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र, त्यापूर्वीच खा. हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने माझी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासमोर महायुतीकडून कोणाचे आव्हान असणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप आशा तिन्ही पक्षाकडून नाशिकच्या जागेवर दावा केला जात आहे.
हे ही वाचा :- देवळाली कॅम्प मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती कार्यालयाचे उद्घाटन संपन्न......
खा. हेमंत गोडसे व मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्येच उमेदवारीकडून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झालेली नसताना त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खा. हेमंत गोडसे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत असून, त्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्याचीही साथ मिळत आहे
मात्र, गेले तीन दिवस मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी मुंबईत तळ ठोकून बसलेल्या गोडसे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही. पण, शनिवारी (दि.30) नाशिकमध्ये परतताच गोडसे यांनी आपल्या समर्थकसंह शहराच्या शालीमार येथील हनुमान मंदिरात महाआरती करून शक्तिप्रदर्शन केले.
हे ही वाचा :- नाशिक मधील कामगार नगर येथील गुलमोहर कॉलनी येथे युवकाची हत्या..!
यावेळी पक्षाचे शहारध्यक्ष बंटी तिदमे, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांसह पदाधिकारी उपस्थित होते. हेमंत गोडसे यांनी प्रचार करणे, ही चांगली बाब आहे. त्यांना तिकीट मिळाले तर हा प्रचार त्यांना उपयोगी ठरेल. आम्ही सर्व जण एकत्र आहोत.
हे ही वाचा :- चैत्रोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता सप्तशृंगी गडासाठी इलेक्ट्रिक बस....
नाशिक मध्ये भाजपचे 3 आमदार आणि महानगरपालिकेत 69 नगरसेवक आहेत. त्याचा उपयोग आम्हाला निश्चितपणे होईल. कोणी काहीही प्रचार केला, तरी तिकीट मिळाल्यावर आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे.