नाशिक :- नाशिकच्या जागेचा महायुती मधला तिढा हा अध्यापही कायम आहे त्यावरती अजूनही काही तोडगा निघालेला नाही आहे. नाशिकच्या जागेचा माहितीचा किडा अध्यापही कायम दिसतोय नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे पदाधिकाऱ्यांसह आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहे.
त्यामुळे आज या भेटीमध्ये काय होतं हे आपल्याला बघायला मिळणार आहे . सकाळी 11 वाजता गोडसे हे शिंदे यांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गोडसेंच्या भूमिकेकडे अर्थातच लक्ष असेल दुसरीकडे भुजबळ सुद्धा दिल्लीतनं आपल्या नावाचा प्रस्ताव आल्याचं म्हणतायत आणि त्यामुळे नाशिकच्या जागेवर महायुतीतला पेज हा कायम असल्याचा चित्र सध्या बघायला मिळतय.
हे ही वाचा :- गोडसे वेटिंग वर ; प्रचाराची लगिनघाई!
विद्यमान खासदार हे हेमंत गोडसे आहे आणि यांनाच याबाबतचा उमेदवारी मिळेल अशा स्वरूपाची माहिती होती तशा पद्धतीचे बोलले जात होतं श्रीकांत शिंदे जे नाशिक मध्ये कार्यकर्ता मेळावा साठी आले होते आणि त्यांनी याबाबतची हेमंत गोडसे हेच उमेदवार असणार नाशिक मधील जो धनुष्यबाण आहे रामाचा धनुष्यबान आहे तो नाशिकलाच राहील अशा स्वरूपाची घोषणा केली होती आणि त्यावरनं भाजपा सह अन्य जे पक्ष आहे ते देखील नाराज झाले होते आणि नाराजीचे सुरू लागले होते.
त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नंतरच्या काळामध्ये भुजबळ यांचं नाव चर्चेत आलं आणि इतकच काय तर छगन भुजबळांनी माझ्या नावावर दिल्लीतून प्रस्ताव आल्याचा म्हटलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक असतील किंवा हेमंत गोडसे असतील यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
हे ही वाचा :- देवळाली कॅम्प मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती कार्यालयाचे उद्घाटन संपन्न......
या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत हेमंत गोडसे यांनी दोनदा मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन केलेला आहे एक ठाण्यामध्ये आणि एक वर्ष निवासस्थानाच्या बाहेर आणि त्या सगळ्या दरम्यान हेमंत गोडसे यांच्या सह पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले की नाशिकची जागा ही शिवसेनेकडेच राहील आणि त्यानंतर हे सगळे पदाधिकारी हेमंत गोडसे देखील माघारी फिरले होते.
त्यानंतर देखील छगन भुजबळांची जी प्रतिक्रिया आहे कालच्या दिवसाची ती म्हणजे माझ्या नावाची चर्चा ही दिल्लीमधूनच झालेली आहे.