नाशिक: जिल्ह्यातील ग्रामपंचयातीकडे पाणीपुरवठा योजनांच्या १५८५ जोडण्याची ४८ कोटी रुपये विजबिलाची थकबाकी आहे. जानेवारीनंतर जिल्हा परिषदेला जवळपास ६१ कोटी रुपयाचा बंधीत निधी आलेला असून, या निधीतून थकीत विजबिलाचा भरणा करता येणे शक्य आहे.
मात्र, या ग्रामपंचायतीनि आधीच या निधीतून विकास आरखडे तयार केलेले असल्यामुळे निधी खर्चात बदल करायचया असल्यास त्या आरखड्यातील कामांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. अनेक ग्रामपंचयाती थकीत विजबिल भरण्यास तयार नसल्याने जिल्ह्यातील ११० गावांना पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊनही पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
हे ही वाचा : - तलवार धारी अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात.....
राज्यातील ज्या ग्रामपंचायतीनि आधीची विजबिलाची थकबाकी भरलेली नाही, ती भरल्याशिवाय नवीन विजजोडणी न देण्याची महावितरण कंपनीने भूमिका घेतली होती. त्यामुळे ग्रामविकास मंत्रालयाने जानेवारीत राज्यातील सर्व जिल्हा परीषदांना पत्र पाठवून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ही थकीत विजबिलाची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यामुळे जिल्ह्यातील ६१३ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण होऊनही केवळ ५०३ योजनांद्वारे संबधित गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत शकत नाही. जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनांचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण होऊनही जिल्ह्यातील काही योजना सुरूच होऊ शकणार नसल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा : -विहीतगावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात....
सुमारे ६१३ योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण योजना पूर्ण होऊनही केवळ ५०३ ठिकाणीच पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. उर्वरित ११० ठिकणी वीज जोडण्या नसल्यामुळे उद्भव विहीरीना पानी असूनही नागरिकांना त्याचा पुरवठा करता येत नसल्याचे समोर आले आहे.