नाशिक: धारदार तलवारीचा धाक दाखवीत दहशत माजविणारा अल्पवयीन तलवार धारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. जून नाशिक परिसरातील नानावली भागातून त्यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली आहे.
याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानावलीतील सुलभ शौचालय परिसरात मंगळवारी (दि. २ ) दुपारच्या सुमारास एक तरुण तलवारीचा धाक दाखवीत दहशत निर्माण करत होता.
हे ही वाचा : - विहीतगावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात....
याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत १७ वर्षीय अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले.
त्याच्या अंगझडतीत धारदार तलवार मिळून आली. याप्रकरणी पोलिस नाईक संजय पगार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.