रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या सार्वजनिक जयंती कार्यालयाचे उद्घाटन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तथा आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते विलासरावजी पवार यांच्या हस्ते देवळाली कॅम्प येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र संघटक सिद्धार्थ पगारे होते. यंदाचा १३३वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा करावा. असे आवाहन आरपीआयचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आर.डी.जाधव, आरपीआय नाशिक तालुका उपाध्यक्ष अशोक साळवे, आरपीआय नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बोराडे, देवळाली कॅम्प शहराध्यक्ष पंडित साळवे, आर के ग्रुप चे अध्यक्ष राहुल काळे यांनी केले.
कार्यक्रमास आरपीआयचे जेष्ठ नेते ए.के.अहिरे, युसुफभाई सय्यैद, मनोज पगारे, महेंद्र सोनवणे, संतोष गायकवाड,विजय निकम, राजाभाऊ वाघमारे, रवींद्र गांगुर्डे, शिवराज मोरे आदिवासी आघाडी शहराध्यक्ष प्रकाश किरवे, पद्माकर दोंदे,
बाळासाहेब दोंदे, प्रणिल शेजवळ, योगेश लोखंडे, सन्नी मोरे, संदिप गोसावी राजेश पवार, कुणाल जाधव, संदिप धिवरे आदि उपस्थित होते.
हे ही वाचा :- चैत्रोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता सप्तशृंगी गडासाठी इलेक्ट्रिक बस....
प्रारंभी डॉ.बाबासाहैब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष सिध्दांत पद्माकर दोंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तर सुभाष बोराडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले गौतम भालेराव यांनी आभार मानले.