नाशिककरांनो, अब दिल्ली दूर नही......

नाशिक: उडान अंतर्गत सर्वाधिक प्रतिसाद मिळालेली नाशिक दिल्लीची विमान सेवा बंद पडल्यानंतर ती पुन्हा  सुरू झाली  नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांनी नाशिकला सेवा देण्याचा प्रयत्न केल्यानंतर दिल्लीची प्रतीक्षा कायम होती. मात्र, ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून, एक कंपनीने  राजधानीसाठी सेवा देण्याचा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालायला दिला  आहे.  त्यानुसार मे महिन्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

नाशिकमधून अन्य शहरांना  जोडणारी विमान सेवा सुरू व्हावी ही प्रदीर्घ काळापासूनची मागणी पूर्ण झाली असली तरी सुरुवातीला नाशिक- दिल्ली ही झालेली विमान सेवा सर्वात चांगली होती. दिल्लीला  जाणाऱ्याना आणि त्यापुढेही अन्य देश विदेशात जाण्यासाठी ही सेवा किफायतशीर होती. त्यामुळे प्रवाश्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. मात्र, संबंधित विमान कंपनी अडचणीत आल्यानंतर ही सेवा बंद झाली. त्यांनातर एका कंपनीने ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही.

हे ही वाचा :- नाशकात अमित शाह, शिंदे, पवार, ठाकरेंची होणार सभा......

 सध्या तर केवळ इंडिगो कंपनीची सेवा सुरू असून, अन्य कंपन्यांनी उडान संपताच काढता पाय घेतला. इंडिगोने मात्र, नाशिकला दिलेले महत्व कायम राखले आहे. इंदूर, नागपूर, अहमदाबाद, गोवा पाठोपाठ लखनौला   देखील विमान सेवा सुरू झाली आहे. लखनौ पासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर अयोध्या असून, सध्या धार्मिक पर्यटनासाठी हॉट स्पॉट ठरलेली ही नगरी गाठण्यासाठी लखनौ सेवा उपयुक्त ठरणार आहे.

१. एकीकडे नाशिकच्या विमान सेवेचे पंख छाटले  जात असून, इंदूर विमान सेवा आता आठवड्यातून तीनच दिवस करण्यात आली आहे. तर, अहमदाबाद येथे जाण्यासाठी दोन विमान सेवा सुरू होत्या इतका प्रतिसाद मिळत होता.

हे ही वाचा :- शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभा लढवण्यावर ठाम ; संजय राऊत यांची प्रतिक्रिया .......

२. त्यातील एक फ्लाइट सांभाजीनगर येथे पळवण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे नाशिक-दिल्ली विमान सेवा सुरू होत आहे. ही चांगली बाब ठरली आहे.

हे ही वाचा :- शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभा लढवण्यावर ठाम ; संजय राऊत यांची प्रतिक्रिया .......

३. नाशिककडून दिल्ली विमान सेवा सुरू करण्यासाठी दिल्ली येथील विमानतळाच्या स्लॉटचा अडथळा आहे. तो दूर होण्याची शक्यता असून, यामुळेच एक कंपनीने मे महिन्यापासून दिल्लीसाठी विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला.

Previous Post Next Post