विहीतगावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात....

 नाशिक: शहरातील उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विहीतगाव येथे कार्यरत लाचखोर  तलाठी आरोपी सतीश गिरीश नवले (४८, रा. अक्षरधारा अपार्टमेंट, उपनगर) यांच्यासह त्यांचा खासगी मदतनीस दत्तात्रय सुखदेव ताजणपुरे (४३, रा. उज्जवल कॉलनी, चेहडी) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेज्थत जाळ्यात घेतले.

तक्रारदारकडून तडजोड अंती ३ हजार रुपयांची लाच  स्वीकारली असता  पथकाने बुधवारी (दि.३) अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदार महिलेच्या पतीच्या नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये  तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होत होता.

हे ही वाचा : - लव ट्रँगल मधून मित्रानेच केला मित्राचा खून....

यामुळे नाशिकचे तहसीलदार यांनी त्यांचा मालकीचे क्षेत्र ०.०१ चे एकूण मूल्यांकन रक्कम रुपये एक लाखाचे  २५ % प्रमाणे  २५ हजार रुपयांचा भरणा  केला. यानंतर तहसीलदार यांनी नवले यांना इतर अधिकारतील तुकडा नियमाधिकारण   अधिमूल्य  हा शेरा तक्रारदार यांच्या पतीचे नाव असलेल्या क्षेत्रपुरता कमी करण्यात यावा; असे आदेश दिले होते.

या दोघाविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यन्त गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

मदतनिसाद्वारे  मागणी: 

तक्रारदार यांचे काम प्रलंबित असल्याने नवले त्यांच्यासोबत त्यांचे काम करणारे खासगी मदत नीस ताजणपुरे यांच्याकडे गेले असता त्यांनी त्यांचे काम करून देण्याच्या मोबदल्यात नवले  यांच्या सांगण्यावरून ४ हजारांची लाचेची मागणी पंचांसमक्ष केली. 

हे ही वाचा : - नाशिकमध्ये नराधम इसमाचा अल्पवयीन पुतणीवर बलात्कार ......

तडजोड अंती  त्यांनी ३ हजारांची लाच घेण्याचे मान्य करत   पंचांसमक्ष  स्वीकारली असता  सापळा  अधिकारी पोलिस निरीक्षक संदीप घुगे, नाईक गणेश निंबाळकर, नितीन नेटारे  यांच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.

Previous Post Next Post