राज्य तापमानात मोठी वाढ होत असताना पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाटण्याची शक्यता वर्तवली याचबरोबर काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील मुंबई सह पालघर रायगड ठाण्यात तापमानात वाढ होईल तर विदर्भात यवतमाळ अकोला चंद्रपूर देखील पुढील तीन दिवस पारा चांगलाच वाढणार आहे तर काही ठिकाणी शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
पोक्सो अंतर्गत आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास
नाशिक अहमदनगर सोलापूर जालना बीड नांदेड लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये सहा तारखेनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आले राज्याच्या संपूर्ण भागामध्ये कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही पुणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा सायंकाळी आकाश अंश:ता ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेनेत प्रवेश घेणार ..?
त्यानंतर आकाश अंशतः ढगा राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे