नाशिक: मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून मोठया प्रमाणात होणारी घोरपडीची लिंग व इंद्रजालची तस्करी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय केंद्राच्या पथकाला रोखण्यात यश आले आहे. पथकाने शनिवारी दि. 13 मध्यरात्री बारा वाजता सापळा रचून संशयितास अस्वलादरा भागातून ताब्यात घेतले. अन्य एक संशयित फरार होण्यास यशस्वी ठरला. संशयितांच्या ताब्यातून 781 लिंग व 20 किलो इंद्रजाल जप्त करण्यात आले आहे. आदेश खत्री पवार (रा. अस्वलदरा , नांदगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोपनीय तस्करीविरोधी गुप्तचर संस्था महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डी आर आय ) मुंबई विभागीय केंद्राच्या अधिकाऱ्याना मनमाड रेल्वे स्थानकावर ही कारवाई केली. निखिल सावंत यांच्या पथकाने अस्वलदरा भागात छापा टाकून पवार यास ताब्यात घेतले. आदेश खात्रीचा साथीदार पळून गेला. पूर्व वनविभागाचे उपवनरक्षक उमेश वावरे, विभागीय वनधिकारी (दक्षता) विशाल माळी, प्रभारी सहायक वन संरक्षक अक्षय म्हेत्रे, नांदगाव वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त घोरपडीचे लिंग व इंद्रजाल अस्सल असल्याची खात्री पटविली. पथकाने आदेश खत्री यास ताब्यात घेतले. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
30 लाखांचा एवज हस्तगत
घोरपड या वन्य प्राण्याची सुमारे 781 लिंग तसेच सागरी जीव असलेले इंद्रजाल साधारणत: 20 किलो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी मुद्देमालची अंदाजे किंमत सुमारे 30 लाख रुपये इतकी असल्याने सूत्रांनी सांगितले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.