राजकीय पक्षातील इच्छुकांना मराठा समाजाकडून मनाई....

नाशिक: लोकसभेचे दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने मराठा क्रांती मोर्चा सह समाजाच्या बैठकीत चाचणी करण्यात आली यावेळी राजकीय पक्षातील इच्छुकांना या समाजाकडून उमेदवारी देऊ नये असा ठराव करण्यात आला.

त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी इच्छुकांची नावे देखील घेण्यात आली आणि कोर कमिटीच्या माध्यमातून ती समाजाचे नेते मनोज रंगे पाटील यांना पाठविली जाणार आहे त्यानंतर ते उमेदवारी निश्चित करणार आहेत.

 नाशिक मधील सकल मराठा समाजाचे बैठक गुरुवार (दि.२८) औरंगाबाद रोडवरील शेवंता लॉन्स येथे घेण्यात आली यावेळी हा निर्णय घेण्यात आला यावेळी समाजासाठी अनेक वर्षापासून काम करणारा आणि मोर्चा आंदोलने करण्याप्रसंगी जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याचे ठरविण्यात आले.

नाशिकचे लोकप्रिय खासदार. हेमंत तुकाराम गोडसे पदाधिकाऱ्यांसह वर्षावर तळ ठोकून.....


कोणत्याही राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला किंवा इच्छुक उमेदवाराला सकल मराठा समाज पाठिंबा देणार नाहीत तसे निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तरच कुठल्याही राजकीय उमेदवाराला सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देणार आहे.

 नाशिक जिल्ह्यात एकमताने चळवळीतील उमेदवार ठरवावा असे यावेळी ठरवण्यात आले कोर कमिटीने नियुक्त केलेले समिती चंद्रकांत बनकर डॉक्टर सुनील ढिकले प्राचार्य हरीश आडके विलास पांगारकर शिवाजी सहाणे बापूसाहेब चव्हाण अण्णा पाटील यांचा समावेश आहे.

आंबेगाव येथील शेतकऱ्यांच्या उद्योजकाने फसवणूक करून बळकवली शेत जमीन


सदर कमिटी लोकसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून काम करीत आहे यावेळी झालेल्या बैठकीला करण गायकर शिवाजी सहाने नाना बच्छाव दत्ता गांगुर्डे नारायण जाधव नारायण भोसले सचिन पवार आदी सहसकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आता राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा..

नाशिक मध्ये वाजेंच्या उमेदवारीमुळे करंजकर संतप्त ; भुजबळांच्या नावाने गोडसे त्रस्त !

  •  मराठा समाजाने आजवर अनेक राजकीय पक्षांना उमेदवारी देऊन निवडून दिले आहे.
  •  आता राजकीय पक्षांनी देखील मराठा समाजाच्या वतीने उभ्या करण्यात येणार संधी द्यावी असा ठराव यावेळी करण्यात आला
  •  येत्या 30 मार्च रोजी जरांगे पाटील हे भूमिका स्पष्ट करणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. 

 हे आहेत प्रमुख उमेदवार....

 नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी करण गायकर, नाना बच्छाव, विलास पांगारकर, डॉ. सचिन देवरे, बाळासाहेब गाडे यांच्या अन्य काही दावेदार आहेत तर दिंडोरी मतदार संघातून भारतीय जोंधळे ज्योती ढोमसे कोमल गांगुर्डे आधी सह दहा ते बारा दावेदार आहेत.
Previous Post Next Post