लासलगाव : येथील एका स्टील कंपनीच्या मालकांनी येवला तालुक्यातील मौजे आंबेगाव येथील एका शेतकऱ्याचे फसवणूक करून त्याची जमीन बेकायदेशीर रित्या बळकावली असल्याची तक्रार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्राप्त झाली होती.
हे ही वाचा : एप्रिल ठरेल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हीट..
हे ही वाचा : प्लॅस्टिक बंदीप्रकरणी १५० ठिकाणी तपासणी ; कारवाई ११ ठिकाणीच ..!
या तक्रारीची दखल घेतली की यांनी आवर सचिवांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आव सचिवांनी तक्रारदाराच्या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करावी अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिनांक 21 मार्च रोजी दिली आहे.
मौजे आंबेगाव येथे गट नंबर 329 मध्ये तक्रारदार मयूर सोनवणे यांचे वडील भाऊसाहेब सोनवणे यांच्या वडिलोपार्जित मालकीचे एक हेक्टर 40 आर क्षेत्र आहे. ही शेती मिळकत दिनांक 20 जून 2006 रोजी गुजरात येथून व्यापारासाठी लासलगाव येथे आलेल्या एका उद्योजकाने शेतकरी असल्याचे भासवून बेकायदेशीर रित्या खरेदी केली होती.
हे ही वाचा : वाजेंच्या उमेदवारीमुळे करंजकर संतप्त ; भुजबळांच्या नावाने गोडसे त्रस्त !
खरेदी करताना महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून तयार केलेल्या बनावट दस्तानच्या व 1992 साली केलेल्या बनावट खंड पत्राच्या आधारे ते शेतकरी आहेत असे दर्शवून तक्रारदारांच्या वडिलांची तसेच निफाड येवला परिसरातील व नाशिक जिल्ह्यातील बरेच शेतकऱ्यांच्या शेत मिळकती बेकायदेशीर रित्या बाळकावले असल्याचे मयूर सोनवणे यांनी शासनाला पाठविलेल्या पात्रात म्हटला आहे तसेच संबंधित उद्योजकाविरुद्ध कारवाई करून त्याने बळकावलेल्या सर्व जमिनी सरकार जमा कराव्यात अशी मागणी केली आहे.
हे ही वाचा : प्लॅस्टिक बंदीप्रकरणी १५० ठिकाणी तपासणी ; कारवाई ११ ठिकाणीच ..!
या तक्रारीची दखल घेत महसूल अवर सचिवांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आले असल्याचे समजते.