नाशिक : शिवसेना ठाकरे गटाने नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करत नाशिक लोकसभेच्या जागी करिता आघाडी घेतली असली तरी दुसरीकडे मात्र महायुतीतील जागेचा तिढा कायमचा असल्याने खासदार हेमंत गोडसे यांच्यावर वेटिंगची वेळ आली आहे शिवसेनेचे शिंदे गटातर्फे आठ उमेदवारांची पहिली यादी गुरुवार दिनांक 28 रोजी जाहीर झाली.
हे ही वाचा : एप्रिल ठरेल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हीट..
त्यात नाशिकचा समावेश नसल्याने दोनदा मुख्यमंत्र्यांसमोर शक्ती प्रदर्शन करूनही गोडसे यांची उमेदवारी साठीची प्रतीक्षा कायम आहे उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत तळ ठोकून राहणार असल्याची भूमिका शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतले आहे.
महिन्याभरापासून नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीतील घटक पक्ष भाजप,शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात जोरदार रसिकेत सुरू आहे त्यातही भाजप आणि शिंदे सेना यांच्यात उमेदवारी करिता शक्ती प्रदर्शन सुरू असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढीस लागली आहे.
हे ही वाचा : वाजेंच्या उमेदवारीमुळे करंजकर संतप्त ; भुजबळांच्या नावाने गोडसे त्रस्त !
खासदार हेमंत गोडसे सलग दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आल्याने या जागेवर शिवसेनेचा दावा प्रबळ असला तरी भाजपच्या शिस्तमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेत या जागे करिता मागणी केल्याने महायुतीतील राजकीय संघर्ष वाढला आहे. नाशिक मध्ये फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाल्याने भाजपच्या पदाधिकारी व इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत भाजपच्या कोअर कमिटीने यासंदर्भातील प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे.

खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारीसाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर शक्ती प्रदर्शन केले तसेच भाजपचे नाशिक शहरातील तिन्ही आमदार स्थानिक पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी ना. फडणवीस यांची भेट घेतली होती दोन्ही पक्षात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते ना. छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्याने नाशिकच्या जागेसाठी नवीनच ट्विस्ट समोर आल्याने सर्वांचीच अस्वस्थता वाढली आहे.
हे ही वाचा : आंबेगाव येथील शेतकऱ्यांच्या उद्योजकाने फसवणूक करून बळकवली शेत जमीन
भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा अधिकच वाढल्याने बुधवार दिनांक 27 सायंकाळ पासूनच गोडसे शिंदे कट्ट्याचे स्थानिक पदाधिकारी मुख्यमंत्र्याचे निवासस्थानासमोर ठिय्या मांडून आहेत.
शिंदे गटाची दुसरी यादी आज.....
आठ उमेदवारांची पहिली यादी शिंदेगटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर दुसरी यादी शुक्रवार दिनांक 29 ला जाहीर होणार आहे दुसऱ्या यादीत खासदार हेमंत गोंडसे यांच्या नावाचा समावेश असेल असा विश्वास सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कायम आहे.