नाशिक : वीज वितरण कंपनीच्या ठाणे येथील भरारी पथकाने शहरातील पाथर्डी शहरात छापे टाकून वीस चोरीचे तीन प्रकार उघडकीस आणले तब्बल सहा लाख रुपये किमतीची वीज चोरी करण्यात आल्याची धक्कादायक बाब या कारवाईतून समोर आले असून याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हे पण वाचा : राजकीय पक्षातील इच्छुकांना मराठा समाजाकडून मनाई....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी शिवारात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याची माहिती ठाणे येथील भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरीश भवर यांच्या मार्गदर्शनाखाली छापे टाकण्यात आले पथकाने मुरलीधर नगर येथील किर्तन रेसिडेन्सी या संकुलात तपासणी केली त्यावेळी सोनाली अहिरे व धनंजय अहिरे या मालकीच्या सदनिकेत विज चोरी केल्याचे प्रकार समोर आला आहे.
हे पण वाचा : नाशिकचे लोकप्रिय खासदार. हेमंत तुकाराम गोडसे पदाधिकाऱ्यांसह वर्षावर तळ ठोकून.....
दिनांक 4 ऑगस्ट 2022 ते 15 मार्च 2024 दरम्यान या ठिकाणी सुमारे एक लाख 53 हजार 680 रुपयांचा सहा हजार 876 युनिट ची चोरी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
विच चोरीचा दुसरा प्रकार याच भागातील अलकापुरी परिसरात उघडकीस आला अल्कानंद अपार्टमेंटमधील रहिवासी पंढरीनाथ पोपटराव चौधरी यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित चौधरी यांनी दिनांक 17 डिसेंबर २०१६ ते १६ मार्च 2024 दरम्यान दहा हजार 490 युनिट ची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी वीज कंपनीचे तब्बल दोन लाख सात हजार दोनशे दहा रुपयाचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा : नाशिक मध्ये वाजेंच्या उमेदवारीमुळे करंजकर संतप्त ; भुजबळांच्या नावाने गोडसे त्रस्त !
तिसरा प्रकार वडनेर दुमाला भागात उघडकीस आला याबाबत शंकर पांडे (रा. तलाठी कार्यालयाजवळ अर्टलरी सेंटर रोड) यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पांडे यांनी दिनांक 2 डिसेंबर 2020 ते 16 मार्च 2024 दरम्यान निवासी विजेची तब्बल 11,620 युनिट ची चोरी केली या चोरीतून वीज कंपनीचे दोन लाख तीस हजार 130 रुपयांचे नुकसान झाले आहे.
तिन्ही घटनांप्रकरणी हरेश भवर यांनी दिलेल्या फर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे इंदिरानगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहेत.