अंबड : औद्योगिक वसाहतीतील कामगार हे ड्युटी करून रात्री घरी जात असताना अंधाराचा फायदा घेत चाकू आणि धारदार शास्त्राचा धाक त्यांना दाखवून त्यांच्याकडील मोबाईल तसेच रोकड हिसकावून घेत लूट करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी पर्धा फास्ट केलेला आहे. या संशिताकडून पोलिसांनी 30 मोबाईल सह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
औद्योगिक वसाहती मधील कामगारांची लूट होण्याचे प्रकार सातत्याने घडत असून याबाबत अंबड परिसरातील कामगारांनी तक्रार देखील दाखल केलेली होती. त्या अनुषंगाने एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीचे निरीक्षक मनोहर कारंडे यांनी लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केलेले होते.
हे ही वाचा : जॉगिंग ट्रॅक की वाहनतळ? १० वर्षापासून समस्या कायम....
गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र टीम तयार करण्यात आली त्यानुसार निरीक्षक मनोहर कारंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने औद्योगिक वसाहतीत सापळा रचला.
24 वर्षे मंगेश उर्फ मंग्या अंकुश पवार, 24 वर्षे कुणाल रवींद्र पगार, 22 वर्ष निलेश उर्फ निल्या देविदास खरे आणि 24 वर्षे कुणाल यादव जाधव या चौघा संशयित आरोपींना ताब्यात घेतलेला आहे.
हे ही वाचा : नाशिक मध्ये पुन्हा एमडी (ड्रग्स) विक्री करणाऱ्याना दोघाणा पोलिसांनी ठोकल्या बेड्या...
त्यांची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता जबरी चोरी केलेला मोबाईल पैकी एक मोबाईल फोन घेऊन आला. आरोपींकडे त्यांच्या इतर साथीदारांबाबत आणि जबरी चोरी केलेल्या इतर मोबाईल बाबत कसून तपास करून विचारण्यात केली असता 30 मोबाईल फोन एक धारदार चाकू दोन मोटरसायकली असा एकूण तीन लाख 54 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक अतुल पाटील, संदीप शेवाळे, समाधान चव्हाण, जनार्दन ढाकणे यांच्या पथकाने केलेली आहे.