इंदिरानगर : दहा वर्षापासून येथील जॉगिंग ट्रॅकचा प्रवेशद्वार आत ट्रॅक वर सरासपणे अनधिकृतपणे वाहन तळ निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ ? असा खुलासा मनपा प्रशासनाने करावा, अशी मागणी होत आहे.
हे ही वाचा : नाशिक मध्ये पुन्हा एमडी (ड्रग्स) विक्री करणाऱ्याना दोघाणा पोलिसांनी ठोकल्या बेड्या.........
जॉगिंग ट्रॅक वर विटाचे तुकडे टाकून त्यावर लाल माती टाकून सपाटीकरण करण्यात आले. फेरफटका मारण्यासाठी दोन मार्ग करण्यात आले आहेत. नूतनीकरण करण्यात आल्याने जणूकाही कात टाकल्याचे दिसून येत आहे. चालणे हा शरीरसाठी उत्तम व्यायाम असल्याने परिसरातील आबालवृद्ध सकाळ व सायंकाळी जॉगिंग ट्रॅक वर असतात. युवक, युवती, महिला व ज्येष्ठ नागरिक यांची जॉगिंग व ग्रीन जीमवर व्यायामासाठी सकाळी या सायंकाळी वर्दळ असते.
परंतु उड्डाण पुलाच्या समोरील जॉगिंग ट्रॅक च्या प्रवेश द्वाराच्या आत सुमारे दहा वर्षापासून वाहन बाजाराच्या विक्रीची चारचाकी वाहने सरासपणे लावण्यात येत आहेत.
अद्यापपर्यन्त महापालिका प्रशासनाला दिसून कसे आले नाही ? असा संतप्त प्रश्न नागरिकांनी केला आहे. त्यामुळे जॉगिंग करणाऱ्या नागरिकांना त्रास होतो जॉगिंग ट्रॅक आहे का वाहनतळ? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. आचार संहिता सुरू असल्याने आता तरी जॉगिंग ट्रॅक वाहनमुक्त करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी इंदिरानगरचा जॉगिंग ट्रॅक हक्काचे स्थळ आहे. सकाळी आणि सायंकाळी येथे जॉगिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र या समस्यामुळे ज्येष्ठ नागरिकाना त्रास सहन करावा लागतो.